Sunday, June 8, 2008

अस्वस्थता

गेले कित्येक दिवस मी अस्वस्थ आहे. काहीतरी लिहायचंय. काय ते नक्की माहिती नाही. अनेकदा लिहायला बसते. थोडेफार लिहिते, मग त्यावर काट मारते. आवडतच नाही मी लिहिलंय ते! मला खूप काही सांगायच आहे. पण ते खूप काही इतकं आहे की कुठून सुरूवात करू आणि काय काय सांगू असं होते. अनेक मुद्दे आठवतात पण त्या मुद्द्यांची सुसंगत साखळी होतच नाही.

0 comments: