Wednesday, July 11, 2012

असंच काहीतरी...

आवरा-आवर करताना जुनी diary सापडली. जरा चाळली. ही पान वाचली.  share करायला हरकत नाही अस वाटलं म्हणून इथे post करते आहे. तारीख:- ३ जून २००८. 

लिहायला घेतलंय तर खर. पण माहिती नाही, खात्री नाही की  किती वेळ मिळेल लिहायला ! सुरुवात झाली हेही नसे थोडके !

हे लिहिण्यातून काय होईल ? मला समाधान मिळेल. ही विस्तृत diary आहे. स्वतःसाठी.... स्वतःला समजण्यासाठी... 

कदाचित, अजून कुणाला तरी माझ्या अनुभवातून फायदाही होईल. विषय आहे की,  मी आई झाल्यामुळे आयुष्यात झालेला मोठा बदल. 

हे सगळ खूप व्यक्तिगत आहे. व्यक्तीसापेक्ष आहे. जे routine सध्या सुरु आहे. त्याबद्धल प्रश्न, काळजी आहे. जोपर्यंत ती आतून असते तोपर्यंत ठीक असते. पण जेव्हा इतर कोणामुळ हे शांत पाणी सैरभैर होत तेव्हा प्रवाहाची गतीच बदलते. 

स्थितप्रज्ञता ! किती आवश्यक आहे हे तेव्हा कळते. निंदकाचे घर असावे शेजारी. शाळेत शिकलेला सुविचार प्रत्यक्षात अंमलबजवणी करताना फार जड जातोय झेपायला. एकूण काय तर, स्वतःवर, स्वःताच्या निर्णयांवर, शक्तींवर, भविष्यावर विश्वास हवा. "नमनाला घडाभर तेल" झालंय. आता सुरुवात करतेच. 

सध्या प्रश्न आहे तो स्वतःसाठी मिळणाऱ्या वेळेचा. स्वतःच्या space चा ! अर्हन आता वर्षाचा होईल. आता असं वाटायला लागलंय की मला without disturbance वेळ मिळायला हवा. तसा थोडाफार मिळतो. तो मी वर्तमानपत्र वाचन, e-mails , social networking , diary लिहिणे यासाठी वापरते. खूप त्रास कधी होतो ?
 " बाकी तू काय करतेस? " या (खोचक ?) प्रश्नानंतर !

 मला वाटतं की  ही संभ्रमावस्था, चिडचिड ...माझ्यासारख्या अनेक आयांची होत असणार. विशेषतः परदेशात, without any support मुलं वाढवणाऱ्यांची. म्हणजे परिस्थिती व्यक्तिगत असली तरी त्यातून होणारी भावनांची आंदोलनं खूपच सामायिक, common असणार. 

आजतरी माझ्या आजूबाजूला अनेक आया दिसतात. अशीच लहान मुले असणाऱ्या, नोकरी करणाऱ्या आणि पूर्ण वेळ मुलांकडे पाहणाऱ्या किंवा घरातून काम करणाऱ्या. प्रत्येक जण मानसिक, भावनिक चढ-उतार अनुभवत आहे. त्यात मुलं घडवण्यातील, वाढवण्यातील आनंद आहेच. पण संभ्रमही आहेच. आपण काय करत आहोत याबद्धल. 

जे आपल्याकडे आहे त्यापेक्षा जे नाही त्याकडे पाहिल्यामुळे तर कित्येकदा "इतर प्रभावा" मुळे स्वतःच्या निर्णयाबद्धल साशंकता निर्माण होते. खर तर आई झालेली प्रत्येक  स्त्री यातून गेलेली असते. तरी मग या बायका असं का वागतात ? हा प्रश्न तर पडतोच. " मुलांना वाढवणं, बाल संगोपन "  हे जिव्हाळ्याचे विषय, " स्वतःच मुल असावं " ही बहुतेक प्रत्येकीला असणारी आंतरिक इच्छा. जरी DINK चा ट्रेंड असला तरी !

अर्हन उठला have to go :-)

1 comment:

शांतीसुधा (Shantisudha) said...

छान मनोगत! खरंय स्त्रियांनीच स्त्रियांना समजुन घेतलं पाहीजे. अनेकवेळा यात स्त्रियाच कमी पडतात पुरूषांपेक्षा. मी सरळ सरळ दुर्लक्ष करते. आता तू मुलांच्या संगोपना बद्धल लिहीलं आहेस. माझ्यासारख्या करिअर करणार्‍या व्यक्तीला मुद्दामहून खोचक प्रश्न विचारतात, मग काय आता पाळणा कधी हलवणार? ते काय एखादं खेळणं आहे का? मदतीला तर कोणी येणार नाही. मी सरळ दुर्लक्ष करते.