Tuesday, November 6, 2012

भिंतीवरचं घड्याळ.

भिंतीवरचं  घड्याळ, मला आजोबांसारख वाटतं .......


त्याची जागा, स्थायी.. ठरलेली...
अगदी सवयीची,

आजोबांच्या सवयीसारखी...

अखंड चालत असतं ....
निरपेक्षपणे...

आजोबांच्या सोबतीसारखघड्याळ भिंतीवरून काढल्यानंतर ,
मोकळी भिंत दिसल्यावर,
घड्याळ तिथे होते हे  आपल्याला  उमगतं 

इतकं त्याच असणं गृहीत धरलेलं, 

आजोबांसारख...सोबत असताना कळतच नाही की ते आपल्या सोबत आहे.


नसल्यावर मात्र फार  चुकल्यासारखं वाटत राहतं...

मोकळ्या भिंतीवर नजर गेली की कळतं..

अरे घड्याळ  कुठाय?
बंद पडलंय...

आजोबानंतर पण असच काहीसं वाटतं....
चुकल्यासारखं....

काहीतरी अर्धवट राहिल्यासारखं... तृप्ती
७ नोव्हेंबर, २०१२.

No comments:

Winter special Bajra Ladoos

Ingredients:- 3 cups bajra flour, 1.5 cup grated jaggery, approx. 1 cup ghee, 1 tbsp cardamon powder, 2 tbsp dry ginger (soonth...