Translate

मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१३

काटेसावर, शेवरी, शाल्मली aka silk cotton tree

चालत असताना भर गर्दीत जर एखादी आकर्षक स्त्री किंवा पुरुष दिसला तर काय होतं ? सहज मान पुन्हा मागे वळते. वळून परत  एकदा पाहावंसं वाटतं. तसचं होतंय माझं सध्या !

सकाळी फिरायला जाता-येता  अस सारखं वळून-वळून मागे बघतेय वेड्यासारखं.  

त्या काटेसावरीच्या बहरलेल्या झाडाकडे !  एखाद्या नवतरुणी सारखी वाटतेय  मला ती. ओढ लावणारी. कोणत्याही बाह्य आभूषणाशिवाय अंगच्या सौदर्याने मन खेचणारी. वेडं करणारी.   

अंगातील शुल्लक गोष्टींचा आळस, चालायला जाताना कोणी कॅमेरा घेऊन जातं का असल्या नसत्या शंका ,भीड सोडून आज सकाळी कॅमेरा घेऊन बाहेर पडले.  तसा निश्चय कालच रात्री करून टाकला होता. ते सौदर्य, ती माया, सगळं जतन करण्यासाठी, शिकण्यासाठी, share करण्यासाठी. आज सकाळी तिला भेटायचं या विचाराने पहाटे चारलाच जागी झाले, उठून बसले. अक्षरश वेड लागल्यासारखं. 

बहुधा, मग तिनेपण माझ्यावर खूष  होऊन त्या सौदर्याने, मायेने, विविधतेने माझ्यावर वर्षावच केला.  जणू , "बस अब तुम देखती रहो " असं म्हणत ! गेले होते काटेसावरीला भेटायला. तर तिने अजून तिच्या गोतावळ्यची ओळख करून दिली. तिच्या आजूबाजूच्या मित्र-मैत्रिणीची आणि तिच्या अंगाखांद्यावर, आजूबाजूला   खेळणाऱ्या पक्षांची. नीट बघून घे असं म्हणत अगदी मोकळी झाली माझ्याशी.  

ज्यांची अजून पक्की ओळख नाही त्यांचे फोटो, माहिती नंतर खात्रीशीर ओळख झाल्यावर.  तिच्या त्या अवतीभवतीच्या जगाची जेवढी ओळख मला पटली त्याचे हे काही टिपलेले फोटो. 


( गुलाबी रंगातील ही काटेसावर म्हणा किंवा शाल्मली. शाल्मली जरा जास्त बर वाटतंय गुलाबी रंगामुळे असावं :-) )

( शाल्मलीचा हा close-up घेण्याचा प्रयत्न )


(ही काटेसावर  उर्फ शेवरी उर्फ शाल्मली भगव्या रंगातली )


 (हा close-up घेण्याचा प्रयत्न, डावीकडे कोपऱ्यात बुलबुल बसल्येय )


   (हे  फुल जमिनीवर विसावलेलं )


                 ( किचनच्या खिडकीतून  दूरवर दिसणारं  तरुण काटेसावरीचं झाड AKA Red silk cotton  tree )



(  पिवळ्या रंगाचं हे वैभव. उसासे सोडायला लावणारं, पक्षांना आमंत्रण देणारं : इथून खालील काही फोटोत  )










(हे पोपट भाऊ, अगदी सर्रास दिसतात. कोवळं उन खात बसलेत. म्हटलं त्यानाही टिपूयात कॅमेरात )




(बहुधा, हि हरियाल उर्फ green pigeon ची जोडी. हे हरियाल सुद्धा बऱ्याचदा दिसतात. निष्पर्ण झाडांच्या शेंड्यावर समूहात )


आजतर  मी भरून पावले. हे असं काय-काय गवसलं आणि आळसावर, भीडेवर मात करू शकले म्हणून.

शनिवार, १६ फेब्रुवारी, २०१३

नातं "स्वतःशी "जोडण्यासाठी

Today it was a relaxed Sunday morning. It's drizzling here since yesterday. Atmosphere is cool, soothing, beautifully green everywhere. 

These are disordered profound thoughts, points came into my mind. Although pondering upon these thoughts since last many months. They are incomplete. Yet, could not stop myself from penning them down in diary. Here they are unprocessed, as it is. Hope you will get what I mean.

फुले, मध - भ्रमर, पक्षी - परागकण -वंशवृद्धी.
निसर्गाची सगळी साखळीच जीवो जीवस्य जीवनम.

स्त्री-पुरुष -परस्परावलंबन, परस्परपूरक.

veg / non -veg आहारशैली-

समतोल,परस्परावलंबन, परस्परपूरकता  - निसर्गाची योजना.

असमतोल झालाय. शारीरिक शक्ती अधिक असलेला शोषक झालाय का?

कोणतेही २ विरुद्ध ( so called ) वर्ग हे असेच   परस्परपूरक, परस्परावलंबी आहेत. जसे मालक-नोकर. पण तथाकथित, समाजाला मान्य असलेली "ताकद" असलेला वर्ग वरचढ आहे.

दिल्लीतून चिमण्या नाहीशा झाल्यात.एकूणच पक्षी दुर्मिळ होत चाललेत. अत्यंत कसदार, शेतीखालील जमिनीवर टोलेजंग township उभ्या राहिल्यात.

सगळ कळतंय. वळत नाहीये.

निसंशय असमतोल.

हे कुठे जाणार आहे, नेणार आहे हे तंद्री लागल्यावर, विचार करताना कळतंय. पण जगण्याच्या धावपळीत, rat race मध्ये ते भान, ती जाणीव हरवते आहे का?

की, भान, जाणिवांना न्याय देणारे पर्यायच समोर नाहीत? at least, दिसत नाहीत?

उत्तर शोधायला हवीत. शांत, सजग   व्हायला हवंय. जगण्याचा वेग कमी करायला हवाय.

ताकद दे. परिस्थिती निर्माण होऊ दे.

पुन्हा तुझ्याशी नातं जोडण्यासाठी.

नातं  "स्वतःशी "जोडण्यासाठी !



सोमवार, ११ फेब्रुवारी, २०१३

No more hide and seek

Why am I hiding from you ?
When you are there standing still !
I am the one,
who is playing hide and seek,
as and when I wish to !

I am not worried,
I know you are there,
will be there.

That's why playing with you,
such a strange game !
hide and seek,

Dear,
give me strength to face you,
to seek you,

You?
Where are you ?

You,
within me.
surrounding me!

Why this play ?
With that invisible you ?

Many layers on me,
making my vision blur,

Tired of them,
they are making me,
to hide from you.

Want to leave them,
clear them,
dissolve them,
Want to see you clearly,

Everywhere,
All the time !

Usher me !
Lead my way !!!

No more hide and seek,
Please !!!

- Trupti