Sunday, March 24, 2013

तबियत खूश हो गयी ...

अर्हनला म्हटलं, " चल ".  तर, " मी नाही येत " म्हणाला. त्याला तसच घरात एकट सोडून,  घरातला पसारा सुद्धा तसाच टाकून आज सकाळी खाली उतरले . दररोज खुणावणाऱ्या, साद घालणाऱ्या या राजाने आज ओढून, खेचून नेलं .

 ही मंडळी आमच्या शेजारील कॅम्पसमध्ये राहतात. सकाळच्या वेळी बेडरूमच्या खिडकीतून त्याचं सहजपणे दर्शन होतं. त्यांची केका कानी पडते. 

या माझ्या अशा जाण्यावर, ओढीवर, या झपाटलेपणावर माझाच विश्वास बसत नाहीये . वेड,  ओढ, आस की अजून काय म्हणू याला ? आपल्याच अंतरंगात कसलेकसले साठे, ओढी दडल्या आहेत त्याची प्रचीती अशा वेळी येते म्हणावं, का बाह्य वातावरण आपल्या शोधाला कारणीभूत ठरतं म्हणावं ? की अजून काय ? 

असो तूर्तास हे प्रश्न भिजत घालते. पिंजत बसेन निवांत क्षणी.   

तर, त्या काटेसावरीने जसं नवीन नातं जोडलं. तसंच हा राजा मला त्याच्या विश्वात घेऊन गेला. त्याच्या सौंदर्याने, अदांनी पुरतं घायाळ केलं. सगळं डोळ्यात, हृदयात साठवून घेतलंय. भरभरून. कॅमेरातही बंदिस्त केलंय दृश्य स्मृती म्हणून.  त्यापैकी ही काही चित्र . 


ही एक लांडोर. तीला जमिनीवरून या दिव्याच्या खांबावर उडत जाताना पाहिली. 
ह्या सख्या नजरेने संवाद साधताना.    उसासे सोडायला लावणारे सौंदर्य, जादू, माया ?

 हे महाराज पंख पसरण्याच्या  तयारीत ?

 लांडोरच्या पाठीमागे अजून एका मोराचा पिसारा दिसतोय.   
मयुर विहार क्लिपमध्ये टिपण्याचा एक प्रयत्न

http://www.youtube.com/watch?v=KIjaojaSLJA&feature=youtu.be


निर्विवाद सौंदर्याची खाण 
  इतका राजबिंडा, देखणा नर असल्यावर आजूबाजूला माद्या का नाही घुटमळणार ?
कधी कधी स्वतःचाच स्वतःला हेवा वाटतो. तसं आज झालयं. मयुरांच्या संगतीत तबियत खूश हो गयी ... .


Friday, March 22, 2013

Mayur darshan

Today morning this fellow gave 'darshan'.  I have tried to capture him (from our bedroom window). He was there for @ 3-4 minutes. 

 

 

I am speechless. His beauty is beyond words..…. 

  

 Monday, March 18, 2013

"त्या फुलांच्या गंधकोषी… "

सगळं क्रमाक्रमाने पण थोडक्यात सांगते.

काल राष्ट्रपती भवन मधील मुघल गार्डन मध्ये गेले होते. आनंदाची झोळी भरून घेऊन आले. पुढील काही दिवस तरी पुरेल ती आता .

म्हटलं चला, आता ब्लॉग वर त्यातल्या काही फुलांबद्धल share करूयात. म्हूणून बसले संगणक महाशयासमोर.  लिहायला सुरुवातही केली. पण भलतचं !

अर्थात त्याचं कारणही तसंच आहे.

तिथून आल्यापासून सारखं, राहून राहून आठवतंय, मनातल्या मनात गुणगुणते आहे. " त्या फुलांच्या गंधकोषी.. "

मग काय, बसल्या बसल्या गूगलला कामाला लावले. म्हटलं शोधून दे हे काव्य. आणि ही लिंक सापडली. 

 http://www.youtube.com/watch?v=Dj4CHvD-J4Y

केलं त्यावर क्लिक आणि नंतर हे सगळं असं नकळत, क्रमाक्रमाने घडत गेलं .

अंगावर शहारा आला. पायांनी ठेका धरला.  मान डोलू लागली.  पापण्या मिटल्या गेल्या.  हाताची बोटं तालावर फिरू लागली. भरून आल्यासारख झालं, गळ्यात-डोळ्यात काहीतरी अडकलं.

मनमोती अलगत निसटून गेला.…  अगदी पानावरच्या दवबिंदू सारखा. काही क्षणांसाठी, कुठेतरी वेगळ्याच अवकाशात… दूरवर … कुठल्या तरी पोकळीत … आपसुक.


सुंदर अनुभूती. मला तर मजा आली हे अनुभवताना.

लिहून काढली नवीन पोस्ट. तोही एक आनंद.


"जाना था जापान पहुच गये चीन " असं झालंय खरं. पण, 'मजा आ गया'.

अजून काय हवं स्वतःला खूष करायला ?


Friday, March 8, 2013

उन्हाळा

उन्हाळा…   कैरीचं पन्हं, ताक, सरबतं, कोशिंबिरी….


बंद पडदे… 
वेगात पंखे , फुल स्पीड मध्ये ए सी…
आग ओकणारा सुर्य…. 
शांत रस्ते, घाम, चिकचिक, चिडचिड…
सरती दुपार….
वाऱ्याची  झुळूक,  हालचाल, उसासा, किलबिल….
सुर्य परत उद्या येईपर्यंत जरा  हायसे…

परत,

पडदे बंद, सरबतं, पंखे, ए. सी. आणि  वाढत्या पाऱ्याच्या चर्चा…


Monday, March 4, 2013

उन्हाचं पांघरूण

उन्हाचं पांघरूण ओढून सुखस्त पहुडलेला…. 


 उबदार विसावा…माया… 

 

अंगाच मुटकूळं … cozy 


२-३ क्लिकनंतर , चाहूल लागल्यावर माना, नजरा टवकारणारे हे दोघ …  


मग मात्र घेतलेला pause थांबवुन मी चालू लागले .  

कोवळी उन्हं कुणाला नकोत ?

Sunday, March 3, 2013

अजुन काही नव्या ओळखी-पाळखी, आश्वस्थ करणारे सखे, दिलासे !अजुन  काही नव्या ओळखी-पाळखी,
आश्वस्थ करणारे सखे,
दिलासे !मराठीत  पांगारा, संस्कृत मध्ये मन्दारः, पारिभद्रः आणि इंग्रजीमध्ये CORAL TREE नावाने ओळखले जाणारा.  हा माझा नवीन दोस्त. आमच्या CAMPUS मध्ये भेटलेला. 


अत्यंत मोहक रंग. स्पर्शाला मुलायम, तलम अशा फुलाच्या पाकळ्या ज्यावर उभ्या शिरा स्पष्ट दिसतात. हे फुल एखाद्या काटेदार  कणीसातून  आल्याप्रमाणे दिसतं.  मला सुरुवातीला ह्या पांगाऱ्या ने चांगलंच चकवलं, पलाश असल्याच भासवून.निळ्या नभाखाली, हिरवळीवर आणि campus च्या भिंतींना लागून.  वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर, वेगळाच भासतो पांगारा .