Translate

सोमवार, १८ मार्च, २०१३

"त्या फुलांच्या गंधकोषी… "

सगळं क्रमाक्रमाने पण थोडक्यात सांगते.

काल राष्ट्रपती भवन मधील मुघल गार्डन मध्ये गेले होते. आनंदाची झोळी भरून घेऊन आले. पुढील काही दिवस तरी पुरेल ती आता .

म्हटलं चला, आता ब्लॉग वर त्यातल्या काही फुलांबद्धल share करूयात. म्हूणून बसले संगणक महाशयासमोर.  लिहायला सुरुवातही केली. पण भलतचं !

अर्थात त्याचं कारणही तसंच आहे.

तिथून आल्यापासून सारखं, राहून राहून आठवतंय, मनातल्या मनात गुणगुणते आहे. " त्या फुलांच्या गंधकोषी.. "

मग काय, बसल्या बसल्या गूगलला कामाला लावले. म्हटलं शोधून दे हे काव्य. आणि लिंक ही सापडली. मग काय, केलं त्यावर क्लिक आणि नंतर हे सगळं असं नकळत, क्रमाक्रमाने घडत गेलं .

अंगावर शहारा आला.... पायांनी ठेका धरला.... मान डोलू लागली...  पापण्या मिटल्या गेल्या... हाताची बोटं तालावर फिरू लागली....

भरून आल्यासारख झालं, गळ्यात-डोळ्यात काहीतरी अडकलं.

मनमोती अलगत निसटून गेला.…  अगदी पानावरच्या दवबिंदू सारखा. काही क्षणांसाठी, कुठेतरी वेगळ्याच अवकाशात… दूरवर … कुठल्या तरी पोकळीत … आपसुक.

सुंदर अनुभूती. मला तर मजा आली हे अनुभवताना.

लिहून काढली नवीन पोस्ट. तोही एक आनंद.

"जाना था जापान पहुच गये चीन " असं झालंय खरं. पण, 'मजा आ गया'.

अजून काय हवं स्वतःला खूष करायला ?


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: