प्रतिसादाची साखळी

स्थळ:- होंग-छ्याव रोडवरील एक बस-थांबा, शांग-हाय. वेळ:- दुपारी साधारण १२.३० पात्रे:- आजी, आजोबा, २ छोटी नातवंडे आणि मी . पार्श्वभूमी:- दुपा...

Sunday, May 12, 2013

काही वेडं करणारे क्षण ओल्या मातीबरोबर..

गार पाणी पिण्यासाठी म्हणून काल पाण्याचा माठ घेऊन आलेय. घरी आल्यावर ३-४ वेळा माठ खंगाळून धुतल्यानंतर आलेला तो ओल्या मातीचा गंध…. 

अहाहा ! पिऊन टाकावासा वाटणारा…


माठ धुतल्यावर त्या ओल्या माठात डोकावून पुन्हा तो गंध पकडण्याचा प्रयत्न. त्या थंड, ताज्या माठावर स्वतःचे तोंड धरले.
त्या ओल्या काळोखातील  तो मृत्तिकेचा गंध …
त्या थंडगार स्पर्शाची झुळूक …
काही वेडं करणारे क्षण मातीबरोबर.…
आकार दिलेल्या ओल्या मातीबरोबर…
No comments: