Sunday, May 19, 2013

निरोपाच्या कातरवेळी ...

(१९ ऑगस्ट 1२ च्या संध्याकाळी, कातरवेळी, शांघायचा निरोप घेताना डोक्यात उठलेलं विचारांचं काहूर. त्याला मोकळी करून दिलेली वाट).


घराला कायमचं bye-bye करून airport कडे निघालोय. बिल्डींग मधून निघताना नेहमीची, हसतमुख, co-operative  receptionist said, "bye -bye". I told (my 5 year old son) Arhan to say,  bye-bye. But I myself couldn't say bye-bye to her. गळ्यात काहीतरी घट्ट अडकलं होतं. डोळ्यातल्या पाण्याने बांध सोडून गालाचा रस्ता धरला. Just waved my hand towards the receptionist and sat in the vehicle. धारा थांबत नाहीत.

एक स्वप्न संपल्यासारख वाटतंय. खाडकन एखादं  दार बंद झाल्यासारखं वाटतंय. ३ हून जास्त वर्ष होतो इथे. Time flies fast !

आज सकाळी अर्हनला नवीन hot-wheels ची गाडी आणली. तो तिच्याशी खेळता-खेळता Chinese मध्ये संवाद करत होता. त्यात तो त्याच्या Fang-Si -Han या चीनी  मित्राशी बोलत होता, त्याला ती गाडी दाखवत होता. त्याबद्धल सांगत होता.  This poor kid does not know  he will not show that car to Fang-Si -Han, as we are leaving Shanghai. 

मी त्याला म्हटलं, "bye कर घराला".  त्याने विचारलं, " का ? ". I couldn't say anything. 
 
There are sweet memories with people, places. Feeling sad that I won't see these people again. Especially Ayi, CSS friends, Arhan school teachers, his friends, veg. shop vendor etc. etc. the list is loong.I got joy, happiness, friends in the city. I became rich with experiences. कुणाकुणाचा निरोप घेऊ ? मला झेपणारच नाही निरोप घेणं. हे घर, इथल्या खिडकीतून दिसणारा सूर्यास्त. ह्या घराच्या भिंती, दारं अर्हनच्या भावनाविश्वाचे ठसे घेऊन उभ्या आहेत. त्याही उगाच हळव्या झाल्यासारख्या वाटताहेत. संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी, स्वयंपाक करताना किचनच्या खिडकीतून समोरील बागेतून, कानावर पडणारं ते, " आंखे खुली हो या हो बंद " हे गाणं. आणि त्याच्या तालावर पाश्चात्त्य पद्धतीने नाचणारे चीनी लोकं. कोण जाणे एखाद्या बेसावध संध्याकाळी हुरहूर लावून जातीलही.

खूप प्रेम, जिव्हाळा, प्रगल्भता दिली या शहरानं. सगळचं काही सुखकर होतं असं नाही, पण जे त्रासदायक होतं ते आत्ता आठवावसं वाटत नाही. आठवतच नाही.

असो. हे चालायचंच. ह्या अस्तित्वाच्या खुणांचा प्रवास अनंत काळापासून सुरुच  आहे. तो राहणारचं. मला अशासाठी छान वाटतंय की, मी शांघायच्या खुणा स्वतःबरोबर घेऊन निघाले आहे  आणि माझ्या परीने केलेल्या छोट्याशा कामाच्या खुणा इथे सोडून जाते आहे. परत नक्कीच येऊ. पण, तरीही ह्या attachments, ह्या न दिसणाऱ्या जुळलेल्या तारा आता जाताना इतक्या स्पष्ट दिसताहेत. एकदम मोठ्ठ झाल्यासारखं वाटतं.

सगळच एकूण अशाश्वत आहे ही जाणीव. हळूहळू दोरी पुढे सरकते. ती कधी कधी, कुठे नेईल हे  ठामपणे आपण नाही सांगू शकत. विचार केला  वाटतं, हे कालचक्र भराभर फिरतंय आणि आपण मात्र इतकं रमतोय  की जणू हे सगळं कायम असणार आहे. हे हळवे क्षणांचे घाले आठवण करून देतात, सांगतात, " प्यारे, Nothing is permanent. Live truly, fully & spread happiness. 

आता लिहिल्यावर बरं वाटतंय. अजून डोकं जरा दुखतच आहे. पण अश्रुधारांना logical वाट मिळाली. नवीन ठिकाणी पुन्हा settle ही होतो. जुनं इतकं हळवं करतही नाही. पण हे क्षण कसे अचानक हल्ला करतात आणि आपला ताबा घेतात हे कळतच नाही. 

हे ही अशाश्वतच. पण मी हे जगले, अनुभवले म्हणून आनंदी.       

7 comments:

travelinformationbyarvind said...

कोठेही जा पळसाला पाने तीनच असतात .मग तो चीन असो वा भारत वा आपले पुणे. मानवी हळवे मनास काळाच्या सहवासाने तेथील प्रेमळ माणसांचा लळा लागतो, अन तो हृदयाच्या खोलवर कप्यात जावून बसतो अन तेथेच रुजतो देखील . त्यामुळेच निरोपाच्या कातरवेळी ह्या अबोल वेदना जाणवतात अन अश्रुंचा बांध फुटून त्यावर वेदनाशामक असा लेप हळुवार लिंपत जातो.हेच जाणवते .

Trupti Mehta-Deshpande said...

:-))

Alhad Godbole said...

Any place where we stay, gets a room in our mind.. but you have expressed it in very warm words.. keep it up.. keep on writing..

Alhad Godbole said...

Any place where we stay, gets a room in our mind.. but you have expressed it in very warm words.. keep it up.. keep on writing..

Trupti Mehta-Deshpande said...

Thanks Alhad Godbole for your kind words :-))

अनिकेत भांदककर said...
This comment has been removed by the author.
अनिकेत भांदककर said...

छान शब्दात मांडलाय अनुभव. सोबत एखादा फोटो पोस्ट केला असता तर अजून जिवंतपणा आला असता.

हात एक तो हळू थरथरला, पाठीवर मायेने फिरला.....

गेले काही दिवस ह्या कवितेच्या / गाण्याच्या ओळी डोक्यात घोळतायत. मनातल्या मनात गुणगुणते आहे. ते शब्द , तो स्वर, ते संगीत.. हात एक तो हळू...