Wednesday, May 9, 2018

स्वल्पविराम, स्वप्नांना...

उंबरठ्याच्या आत बसून,
एक स्वप्न आकार घेते.

उंबरठ्याबाहेरील,
कल्पनेतील, मनातील, स्वप्नातील विश्वाचे.

पण एक क्षणभरच !

कारण,
लगोलग दुसरा क्षण हजर !

'अपराधी ' पणाची भावना घेऊन,
‘चौकट’ मोडलीस म्हणून !

आणि मग ?

स्वल्पविराम, .....

स्वप्नांना !!! .....


"स्वल्पविराम", 

नीट वाचलंत ना ?

"पूर्णविराम" नाही !!!


- तृप्ती
Post a Comment