Translate

मंगळवार, २६ जून, २०१८

The only constant thing is change !!!

शांत पाण्यावर एका पाठोपाठ ..... अनेक वर्तुळे .... वाढत जाणारी ...
पुन्हा पुन्हा तिथेच नेणारी, थांबणारी ?  पुन्हा पुन्हा तेच सांगणारी??

Impermanence is the only truth !!

कॅसेट rewind करायला हवे. traces शोधायला हवेत, वर्तुळे निर्माण करणारे !

घटना लगोलग वेगात घडत गेल्या की,  एक ब्रेक तो बनता है, to reflect and to learn ! to find and to restore !

--------------------

उद्या अरियाच्या  सद्ध्याच्या शाळेचा शेवटचा दिवस! ऑगस्ट पासून ती दुसऱ्या शाळेत जाणार.  तिची पहिली शाळा ती!भावनिक गुंतागुंत अनुभवते आहे. आईपण !

अशी जागा, अशा व्यक्ती ज्यांनी  माझ्या लेकीची  माझ्या अनुपस्थित उत्तम काळजी घेतली, तिला चांगल्या गोष्टी शिकवल्या, अरियाच्या socialisation process मध्ये  सहभागी पहिली institution ! feeling grateful !!!

Realizing the only constant thing is change !!!

------------------------

सिंगापुरला येऊन अजून वर्ष व्हायचंय . पण आता परत घर बदलायला लागतंय !

नवीन घर पाहण्याचा exercise सध्या जोरात सुरु आहे .

नंतर शिफ्टिंग !

दर २-३ वर्षांनी हा उदयॊग करतेच आहे. पण आता वर्षाच्या आत परत तेच !

घराशी, वास्तूशी तारा  जुळलेल्या असतात. त्या अशा पुन्हा आपल्या पासून मोकळ्या करायच्या. मागे सोडून द्यायच्या. परत नवीन घर set करायचं...  पुढच्या @ २ वर्षांसाठी !

अवघड जातं ! continuous changes ! दमायला  होतंय ?

------------------------

हे घरं पाहण्याचा process मध्ये एक घर सापडलंय. आलिशान !!! त्याचा मालक एक business tykoon आहे. सिंगापुर मधला सगळ्यात श्रीमंत व्यक्तींमधला २ रा ! त्याच्या सिंगापूरमध्ये अनेक properties आहेत.  प्रचंड संपत्ती असलेला हा billionaire ! आताच एकाने सांगितलं की, त्याचा  गेल्या वर्षी मृत्यू झालाय !

--------------------

त्याचा आणि आपल्या सगळ्यांचाच शेवट आणि सुरुवात सारखीच आहे. श्वासापासून श्वासापर्यंत !!!

काय करतोय आपण ? कशासाठी ? हे सतावणारे प्रश्न अशा वेळी खडबडून जागं करतात . भानावर आणतात .

मला काय हवंय नेमके ? हे शोधायला भाग पाडतात.

--------------------------

मुलं भराभर मोठी होताना, positively बदलताना दिसत आहेत. अगदी दररोज ! सगळं सगळं आईपण, पालकत्व १००% जगायचंय ! कारण ते दिवस पुन्हा येणार नाही याची पक्की जाणीव आहे. जमेल तितके फोटो, व्हिडिओ, डायरीत त्यांची वाढ बंदिस्त करायचा प्रयत्न असतो. कारण पुन्हा तेच !!! ... realising the only constant thing is change !

------------------------

इतक्या सतत होणाऱ्या बदलांमद्ये मी जॉब करायचा ठरवला तर वाटते की त्यातून निर्माण होणारा extra  ताण झेपेल का मला ? त्याचे परिणाम my personal and family, physical and mental health वर होतील का ? मला ते चालणार का ? माझं जगणं हरवेल का ?

-------------------------

का, माझा रस्ताच मुळी  पावलो पावली बदलांचा, वळणावळणाचा, वारंवार turn असलेला ? मला "वेगळंच " जगायला भाग पाडणारा ? "वेगळं "बनवणारा ? Living Glorious uncertain life ? की अजून काही ????

प्रश्न पडतच असतात. शोधेन उत्तरं जमतील तशी !!!

------------------------

पण एक सत्य अबाधित आहे हे पक्कच सापडलंय, आत खोल खोल जातंय.

The only constant thing is change ! understand this ! accept this !! just welcome it !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: