Wednesday, December 5, 2018

झरा झालंय ?

कोसळणारा पाऊस,
धुक्याचा पडदा,
थंडगार हवेचा झोत.

पाणी !
थेंब, बुडबुडे, धारा, काचेवर उमटणारी पावसाची नक्षी
पाण्याचीच  अनेक रूपे

सगळं स्वच्छ, मोकळं.....
बाह्यरंग...

आणि अंतरंग ?

आताशा फारसं कोसळतच नाही

बदलतंय हळूहळू ...

साठतच  नाही,
अचानक कोसळायला   !

झरा झालंय ?

वाटेत खाचखळगे आलेच तर धबधब्याचं रूप
पण हे भरून येणं, कोसळणं is no more !

छानच नाही का ?

साठवण्यापेक्षा, कधीतरी कोसळण्यापेक्षा,
रोजच्या रोज वाहतं राहणं,
पावसापेक्षा बारमाही झरा होणं !

-तृप्ती


No comments: