Translate

गुरुवार, ८ ऑगस्ट, २०१९

भस्मविलेपित रूप ......


डोक्यात नकळतपणे  काही ना काही "वाजत" असतं बहुधा. असच ह्यावेळेला गेले काही दिवस background ला हे वाजतय. " भस्मविलेपित रूप ...... काननी ". आज जरा एका निवांत क्षणी  स्पष्टच ऐकू आलं. 

शांताबाई शेळकेंची ही रचना. एकेक शब्द असा पारखून, नेमका. कौतुक, कमाल वाटलं त्या शब्दनिवडीचं. भस्मविलेपित, वैकुंठेश्वर ही जोडाक्षरे ; काननी, पिनाकपाणी, भणंग हे नादयुक्त शब्द; उमा. अपर्णा ही पार्वतीच्या नावांची चपखल निवड आणि एकूणच लक्षपूर्वक ऐकलं तर डोळ्यासमोर शंकर-पार्वतीचे कथाचित्र उभे करण्याची ताकद असलेली एकूणच काव्य निर्मिती, संगीत, स्वर मोहात पाडतेय.

यातील अपर्णा, वैकुंठेश्वर, हिमनगदुहिता या शब्दांचा मनाने पाठपुरावा घेतला.  दुहिता हा कन्येसाठी असलेला समानार्थ भावून गेला. दोन कुटुंबांचे हित साधणारी म्हणून ती दुहिता का ?

दस्तुरखुद्द गानसम्राज्ञी यांचं संगीत, त्यांच्याच स्वरात ! शब्द, संगीत, स्वर, सोबतीची वाद्यवृंद हे सगळं एकत्र येऊन एका अनोख्या सफरीवर घेऊन जातात. मन रेंगाळत काही काळ त्या निर्मितीत.  ज्या सिनेमात, " तांबडी माती " हे गाणं आहे, तो काही अजून तरी पाहिला नाही.  नाही त्या गाण्याचं चित्रीकरण. सध्या तरी आहे हेच पुरेसं आहे मनात रुंजी घालायला. 

कसं सुचलं असेल हे ? काय पार्श्वभूमी असेल ? हे पडलेले प्रश्न अनुत्तरीतच. अजून तरी ! जर कुणाला या गीताविषयी अधिक आणि खात्रीशीर माहिती असल्यास नक्की share करा. आवडेल जाणून घ्यायला.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: