संध्याकाळ,
हुरहूर...
सुखद वारा,
उडणाऱ्या केसांचा चेहऱ्यावर होणारा स्पर्श,
हवाहवासा...
पिवळसर केशरी सूर्य,
ढगांच्या पातळ पडद्याआड...
कुठंय तो?
दूर....
कुठेतरी.
काहीच नकोय आमच्या मध्ये,
हे रस्ते, ह्या गाडया, हे कृत्रिम आवाज...
पडदा दूर...
तो अधिक प्रखर,
सुरेख, पूर्ण वर्तूळ.
सुंदर...
आता,
अर्ध वर्तुळाकार,
आता,
फक्त कोरच जणू,
गेला...
बुडताना दिसतोय,
हळूहळू...
भेटशील न उद्या पुन्हा?
अरे?
अजून आहेस?
खुणा ठेवून..
भेट असाच उद्या,
पुन्हा पुन्हा...
- तृप्ती
२ टिप्पण्या:
chan
Dhanyavaad :-)
टिप्पणी पोस्ट करा