Translate

कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २८ जुलै, २०२०

सामान्य अन असामान्य

सामान्य-असामान्य फक्त माणसच नसतात तर शब्दही असतात

सामान्य, माणसांच्या दैनंदिन वापरातले,
असामान्य,साहित्यिकांशी सहचर्य असलेले

सामान्य माणूस मळलेल्या वाटेनं जातो
तर असामान्यांच्या चालीने "वाट" निर्माण होते

सामान्यातूनच येते असामान्य

जग चालायला दोन्ही हवेच, 
सामान्य अन असामान्यही

हवेत शब्द : सामान्य अन असामान्यही

असाव्यात वाटासामान्य अन असामान्यही

व्हावीत माणसं माणसं

सामान्य अन असामान्यही

- Trupti

रविवार, १२ जुलै, २०२०

तु दिलेली फुलें




कालची, ती..... 
संध्याकाळीं, तु दिलेली फुलें 

आजही... 
ताजीतवानी माझ्या मनीं,

गंध त्यांचा मंद जरीही, 
आजही... 
स्पर्श शहारे तनुभरी 

सैल काही पाकळ्या जरीही,
आजही... 
तंगबंध मनमंदिरी 

मालले दीप जरीही,
आजही... 
चांदण्यांचे रंग उरीं 

मकरंद ओसरला जरीही,
आजही... 
अंश मंजिरीच्या अंतरीं 

सरली ती भेट जरीही,
आजही... 
संग सांगती आठवणी 

कालची, ती..... 
संध्याकाळीं, तु दिलेली फुलें, 
आजही... 
ताजीतवानी माझ्या मनीं! 

- तृप्ती

सोमवार, ११ मे, २०२०

माझा प्रश्न अन् माझेंच उत्तर ?

माझा प्रश्न अन् माझेंच उत्तर ?

प्रत्येक शोषणा मध्ये,
शोषण कर्ता हा, शोषिताला,
“मी तुझे पोषणच करतो आहे”
असं भासवतो का?

आणि मग, परिस्थितीच्या माऱ्याखाली दबलेला,
तो,  ते मुकाटपणे सहन करतो का?

हे शोषण की फसवं पोषण ?
हे असंच असतं का?
“फसवं पोषण ???”
.............

जागे रहो बंदे
हमेशा जागे रहो बंदे  ।

फसों नहीं।
दुनिया में आज भी,
उस लोगोंक़ी कमी नहीं ।

जागो । जागते रहो ।

शोषितों आप ही,
और हाँ,
शोषन करनेवालों, आप भी ।।

- तृप्ती

गुरुवार, १९ मार्च, २०२०

लिख़ने लगी हूँ फिरसे,


झाकोळ... झळाळ

सगळं तसंच रोजच्यासारखं.
तळ्यातलं पाणी, तरुवर, राजहंसही.

फरक इतकाच कीं,
सूर्य झाकोळलेला, मेघांमागे.
कृष्णमेघ.

कुणासारखे तरी, झाकोळ.

मेघ मोकळे झालें कीं
दिसेलंच की तेज.

थांब थोडं, घे विसावा,
ऎक मेघांना, पहा मेघांना
आतल्या अन बाहेरीलही

झाकोळ... झळाळ
निसर्ग नियमच कीं

मग भीती, चिंता कशाला ?

झाकोळ... झळाळ
निसर्ग नियमच कीं !

तृप्ती
२१ जानेवारी, २०२० 

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०

दे दान पहाटेचं



होती कोरी पाटी

होती कोरी पाटी
मारल्या काही रेघा
अन बांधल्या कित्येक गाठी

सोडवत बसता गुंता अन गाठी
भार सोसेना आता
वाटे हवीहवीशी कोरी पाटी

शोधत बसता कशा पडल्या गाठी
दिसती कित्येक माझ्याच उणिवा
अन काही वाटा नियतीसाठी ?

- तृप्ती
२८/०२/२०२०

बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२०

भिंतीवरचं घड्याळ,

भिंतीवरचं  घड्याळ, 
मला आजोबांसारख वाटतं .......

त्याची जागा, 
स्थायी.. ठरलेली.....

अगदी सवयीची,
आजोबांच्या सवयीसारखी......

अखंड चालत असतं ......
निरपेक्षपणे.....
आजोबांच्या सोबतीसारख...


घड्याळ भिंतीवरून काढल्यानंतर ,
मोकळी भिंत दिसल्यावर,
घड्याळ तिथे होते हे  आपल्याला  उमगतं !!!
इतकं त्याच असणं गृहीत धरलेलं !!!
आजोबांसारख.......

सोबत असताना कळतच नाही, 
की ते आपल्या सोबत आहे !

नसल्यावर मात्र, 
फार  चुकल्यासारखं वाटत राहतं...
आजोबांसारख.......

मोकळ्या भिंतीवर नजर गेली की जाणीव,  
अरे घड्याळ  कुठाय?
नाहीये भिंतीवर !!!

आजोबानंतर पण असच काहीसं वाटतं....
चुकल्यासारखं....
काहीतरी अर्धवट राहिल्यासारखं... 

तृप्ती
७ नोव्हेंबर, २०१२.


गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२०

शून्यागार

शून्यागारी शीतल शांत
विरघळती साऱ्या चिंता, भ्रांत

तमात साठल्या त्या तेजाची
ओढ त्या काळ्या काळोखाची

दिवसा अनुभव रात्र काळी
विश्व निराळें, सफर निराळीं

धावे पाझर तो आतून आतून
भेदून कड्या कपाऱ्यातून

भूताच्या त्या गाठी
सुटती नयना वाटी

मंथन अन उकल
सुरात श्वास सकल

सफरी वरती या जावे
काळे-गोरे अंतर पहावें

शून्यागारीं शीतल शांत
शून्यच प्रथमा शून्यच अंत

तृप्ती
२८ जानेवारीं २०२०






का पडते अंतर ?

कधी काळचे सहप्रवासी आपण,
का पडले अंतर ?
का पडते अंतर ?

जाहल्या वाटा निराळ्या,
गती अंतर, थांबे अंतर,
मार्ग अंतर, गंतव्य अंतर ?

मन माझे मानेना
सलते “अंतर”
का पडले अंतर?

अट्टाहास सहचालीचा
सल, कलकल, कोलाहल “अंतर”
का धडपड मिटविण्या अंतर ?
.................

वास्तव अंतर ?
स्वप्न अंतर ?
निसर्गनियम अंतर ?
..................

स्वीकार अंतर,
विविधतेतील सौन्दर्य अंतर,
केवल बाह्य अंतर,

अंतर नसते “अंतर”,
अंतर नव्हते “अंतर”,
अंतर नसेल “अंतर” !

स्वीकार अंतर!
विविधतेतील सौन्दर्य अंतर!

- तृप्ती 🌈
३० जानेवारी २०२०


मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१९

का लिहिते मी ?

 काही “आत” भिडलं की
काहीसं’, 
अस्वस्थ” व्हायला होतं. 

ते “अस्वस्थ“, 
कधी “स्वस्थ” करणारं
तर कधी “अस्वस्थ“ करणारं!  

उतरावावसं वाटतं कागदावर
वाटावंसं वाटतं म्हणून

शब्द येतात सोबतीला, 
मग खेळते त्यांच्या संगे. 

वाटलेल्याला ’वाट’ द्यायचा प्रयत्न करते, 
वाटून मोकळी होईपर्यंत ?

- तृप्ती 

शनिवार, २८ डिसेंबर, २०१९

स्वगृही परत

भटकून इकडे अन् तिकडे
मी स्वगृही परतले
लिहितांना मज वाटे
मजला मी गवसले

केले स्वतःला अलिप्त
काही काळासाठी गुप्त
मारली एकच उडी
मम् अंतर, मम् सवंगडी

खेळले- बोलले त्या सवे
उघडली सकल कवाडे
सापडले आत खोलवर
जपलेले श्वास अन
सोबतीला काही विरंगुळे

माझीच मी लखलाभ मला
श्वास, शब्द सोबतीला
घट्ट दोस्ती ही पुराणीं
मी गातच राहीन आता
अखंड आनंदाची गाणी

-तृप्ती
२७/१२/१९


भयावह सपने

भयावह सपने नें
जगा दिया मुझें,

बीती हुईं घड़ियाँ,
आज भी ,
डरा देती हैं मुझें

ऐ बीती हुईं घडियों,
क्यों सताती हों मुझे ?

या फिर,
आज की इस घडी का,
एहसास दिलाती हो मुझे  ?

मैं ना अब डरूंगी तुमसे,
सिख तो दे दी है तूनें,

शुक्रिया उन,
बीती हुई घड़ियों का,
और,
वो भयावह सपनों का,
मुझे “नींद” से जगाने के लिए।

- तृप्ती
२८/१२/१९

गिरने का डर

चलना जो शुरू किया,
तो गिरने का डर
दिखा रहें हो मुझे ?
उस रास्ते पे चलो ही नहीं,
बता रहें हो मुझे?

ना- ना !

मैं क्यूँ डरु चलने से ?

मैं तो समझू की,
तुम तो सयाना,
कर रहें हो मुझें ।

आगे आने वाली,
मुसीबकों का,
इशारा दे रहे हो मुझे ।

जानती हूँ मैं की,

तुम्हारे दिए हुए डर के कारनही,
खड़ा रहना, सीखा ही नहीं उसने |

जानती हूँ ये भी, की,

दुनिया में ऐसी कोई मंजिल नहीं,
जिस रास्ते पें कठिनाइयाँ नहीं   |

और हाँ, ये भी की,

जो डरा रहा हैं,
वो ही डरा हुआ हैं |
इसलिये मुझें भी,
डरा रहा हैं


तृप्ती
२८|१२|१९

गुरुवार, २६ डिसेंबर, २०१९

छायेंत बोधीच्या आजही

अर्धोन्मीलित नेत्रअन्
स्मितहास्य गाली
ते भाळावरी कुंतलअन्
तें कुंडल कानीं

गुंतलें त्या कुंतलातअन् 
झुलत्या त्या कर्णफुलात
वदनावरच्या त्या तेजांतअन्
साक्षी तुझ्या त्या स्पंदनातं

ते ध्यानातीलं रूप तुझेंअन्
ती स्निग्ध-शांत लोचनें
विरले राग-लोभअन् 
गळालीसर्व व्यर्थ बंधनें

उन्मिषली तव् राजीवनेत्रेंअन्
थिजून गेली मम् गात्रें
स्मितहास्यी मी द्रवलेअन्
सकल संभ्रम निमालें

विदेहत्वी तू आज परी
संदेश तव अंतरी,  
स्व-श्वासांच्या संगे बरसती
संवेदनांच्या सरीं

स्वप्न जागर्ति अजुनही
तुझीच दिव्य लोचनें
छायेंत बोधीच्या आजही
जिवंत तूअन् 
तव वचनें अन् कथनें

तृप्ती , २६/१२/१९

शुक्रवार, २० डिसेंबर, २०१९

धुंद-बेधुंद


फुला-फुलांचे रंग-तरंग,
पाहता काया-वाचा-मन दंग

धुंद-बेधुंद करीती हे गंध
लागला असा हा वेडा छंद

सुटो ना कधीही हा संग
रंगमंद-गंधलागला छंद

भंग जाहलें सारे संग 
तो गंध सांगतसें हो निःसंग 

फुलांसवे मी अभंग 

फुला-फुलांचे रंग-तरंग,
पाहता काया-वाचा-मन दंग

-तृप्ती

या घडीला हलकं- हलकं.

   या घडीला हलकं- हलकं! 



तप्त धरेवर 
पावसाची पखरण.
धरेचा उच्छवास : मृदगंध,
अंतर विरघळवणारा

बाल्कनीत उभं राहून,
हे पाहणारीती.
ती : शांतस्तब्ध

खाली उभं राहून तिला पाहणारा मी.
पाहतच राहिलो तिला,अशी ती
पाहतच राहावा असा तो : पाऊस

काळ्या मेघांचं आभाळ मोकळं झालं
पाहता -पाहता
पाहिलं तिला
वर बाल्कनीत नजर जाता,
तर ? 
तिचंही आतलं आभाळ मोकळं होत होतं
अश्रुरूपी ! 

मोकळी झाली आभाळं.
पाहता-पाहता
एक बाहेरचंसहज दिसणारं,
दुसरं आतलं : सहज  दिसणारं !

स्वच्छमोकळं
या घडीला हलकंहलकं.
आत आणि बाहेरही ! 

तृप्ती 
7/12/19
Goodman Arts Center 

सोमवार, १६ डिसेंबर, २०१९

गुलाबी स्वप्न !



गुलाबी ढगगुलाबी स्वप्न ? 

स्वप्न की सत्य ?

सत्यचिरंतन सत्य

सत्यअसतं का पारदर्शक ? 

पारदर्शकम्हणावं का आत्मदर्शक ? 

आत्मदर्शकअसतं का पाणी ? 

पाणी : भूगर्भातभूवरआसमंतात

आसमंतात एक ऊर्जा

ऊर्जामाझ्यात तुझ्यात

तुझ्यातमाझं प्रतिबिंब

प्रतिबिंबकुठे दिसतं ? 

दिसतं पाण्यातशांत-पाण्यात !

पाण्यात सगळंच सामावतं

सामावतं सारं आसमंत

आसमंतअनंतअमर्याद

अमर्याद आकाशअमर्याद माती

मातीपाणीआकाशपोकळी

पोकळी ? खरंच ? की आभास ? 

आभासज्याचा रंगच गुलाबी

गुलाबीगुलाबी ढगांच्या उरी सामावलाय मावळता रवी

रवी, चिरंतन

चिरंतन रवीचिरंतन जलचिरंतन वृक्ष

वृक्ष : दूतअपत्य मातीचंधरेचं

धरेचं स्वप्नगुलाबी ! 

गुलाबी ढगांचं ! 

गुलाबी ढगगुलाबी स्वप्न ? 

स्वप्न की सत्य ?

सत्य....

- तृप्ती