सगळं क्रमाक्रमाने पण थोडक्यात सांगते.
काल राष्ट्रपती भवन मधील मुघल गार्डन मध्ये गेले होते. आनंदाची झोळी भरून घेऊन आले. पुढील काही दिवस तरी पुरेल ती आता .
म्हटलं चला, आता ब्लॉग वर त्यातल्या काही फुलांबद्धल share करूयात. म्हूणून बसले संगणक महाशयासमोर. लिहायला सुरुवातही केली. पण भलतचं !
अर्थात त्याचं कारणही तसंच आहे.
तिथून आल्यापासून सारखं, राहून राहून आठवतंय, मनातल्या मनात गुणगुणते आहे. " त्या फुलांच्या गंधकोषी.. "
अंगावर शहारा आला.... पायांनी ठेका धरला.... मान डोलू लागली... पापण्या मिटल्या गेल्या... हाताची बोटं तालावर फिरू लागली....

मग काय, बसल्या बसल्या गूगलला कामाला लावले. म्हटलं शोधून दे हे काव्य. आणि लिंक ही सापडली. मग काय, केलं त्यावर क्लिक आणि नंतर हे सगळं असं नकळत, क्रमाक्रमाने घडत गेलं .
अंगावर शहारा आला.... पायांनी ठेका धरला.... मान डोलू लागली... पापण्या मिटल्या गेल्या... हाताची बोटं तालावर फिरू लागली....
भरून आल्यासारख झालं, गळ्यात-डोळ्यात काहीतरी अडकलं.
मनमोती अलगत निसटून गेला.… अगदी पानावरच्या दवबिंदू सारखा. काही क्षणांसाठी, कुठेतरी वेगळ्याच अवकाशात… दूरवर … कुठल्या तरी पोकळीत … आपसुक.
सुंदर अनुभूती. मला तर मजा आली हे अनुभवताना.
लिहून काढली नवीन पोस्ट. तोही एक आनंद.
"जाना था जापान पहुच गये चीन " असं झालंय खरं. पण, 'मजा आ गया'.
अजून काय हवं स्वतःला खूष करायला ?

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा