Translate

शुक्रवार, ८ मार्च, २०१३

उन्हाळा

उन्हाळा दिल्लीतला !

आग ओकणारा सुर्य….

तावदानांचे पडदे बंद,

पंखे, वातानुकूलित यंत्रे भरदाव वेगात,

कैरीचं पन्हं, ताक, सरबतं, कोशिंबिरींची रेलचेल,

आणि

शांत रस्ते, घाम, चिकचिक, चिडचिड…

सरती दुपार….

वाऱ्याची झुळूक, हालचाल, उसासा, किलबिल….

सुर्य परत उद्या येईपर्यंत जरा हायसे…

परत,

पडदे बंद, 

पंखे, वातानुकूलित यंत्रे भरदाव,  

आणि  चर्चा...  वाढत्या पाऱ्याच्या…

-तृप्ती 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: