सोफ्यावर बसून हातातील मोबाईल फोनवर फेसबुक friends updates पाहत होते. तेवढच, पुढील काम करायला घेण्यापूर्वी break, change म्हणून असेल किंवा ती लागलेली खोड असेल. फोनची स्क्रीन वर सरकवत असताना दिसला सचिनने टाकलेला फुलांनी बहरलेल्या झाडाचा फोटो. jacaranda mimosifolia ह्या अवघड नावाच्या बहरलेल्या झाडाचा फोटो आवडला. मग like करून टाकलं.
नुकतच वाचून खाली ठेवलेलं 'ऋतुचक्र' पुस्तक अजून शेजारीच होतं. त्यातील निसर्गातील बदलांचा मांडलेला तपशील, ती निरीक्षण, ते शब्दबध्द करण्यासाठीची ताकद, एकूणच दुर्गाबाई असं काय-काय डोक्यात घोळत होतं. पुस्तकातील "रूपधर फाल्गुन" हा शेवटचा लेख डोक्यात अजून ताजा होता. त्यात दुर्गाबाईंनी ताम्हीनीच्या फुलाबद्धल लिहिलंय. " ते ताम्हीनीचे निळ्या रंगाच्या फुलांचे बहारदार घोस तर काय वर्णावे ? फुलाफुलांची नाजूक मुरडलेली कडा, पाकळीपाकळीचा तो डौलदार नखरा नजर बंदिस्त करून टाकतो. फाल्गुनाची राणीच आहे ही ताम्हण."
लागलीच CLICK झालं, आठवलं ते काल नजरेस पडलेलं, पण अजून मला ओळखीचं नसलेलं, लक्ष वेधून घेणारे आमच्या campus मधील एक lavender रंगाच्या फुलांनी बहरत असणारं एक झाड. ते campus मधील झाड, सचिनने टाकलेला फोटो यात काही साम्य असेल का ? एक प्रश्न. आणि पुस्तकातील ताम्हण सापडली तर ? ह्या उत्सुकता वाढवणाऱ्या प्रश्नाने लागलीच खाली उतरले आणि त्या lavender रंगाच्या फुलांनी बहरत असलेल्या झालाजवळ गेले. ते होते jacaranda mimosifolia aka blue jacaranda ! कोरापुटमधल्या एका jacaranda mimosifolia ने दिल्लीतील एका jacaranda mimosifolia जवळ नेले मला.
सहीच ! तंत्रज्ञान केवळ माणसांनाच एकमेकांच्या जवळ नाही तर आपल्याला निसर्गाच्या जवळही नेऊ शकत. कारण केवळ तो फोटो एवढच निम्मित होतं. Timimg जुळून आल्यासारखं, योगायोग वैगेरे असं वाटलं.अजून एका नव्या सौदर्याची ओळख झाल्याचा, नवीन गवसल्याचा आनंद झाला. हे काही फोटो त्या ज्याकरांडा चे.
घंटेच्या आकाराची ही फिकट जांभळ्या रंगाची फुले आजूबाजूला येणाऱ्या -जाणाऱ्याला खुणावत राहतात.माहीतीजालावरील उपलब्ध माहितीनुसार ही मुळची दक्षिण अमेरिकेतील. ह्या
विदेशी फुलझाडाला ला मराठीत निळी गुलमोहोर असं नाव दिलंय कुणीतरी.
एकूण काय ही विदेशी निळी ज्याकरांडा भारतातही भेटते. दुर्गा बाईंची फाल्गुनाची राणी ताम्हण कधी भेटेल आता ? का तिच्या शोधात ताम्हणी घाटाला भेट द्यायला हवी ? :-) As its state flower of Maharashtra. ज्याला जरुल असही म्हणतात.
असो. प्रश्न पडत राहोत. निसर्गाची ओळख, गट्टी होत राहो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा