गार पाणी पिण्यासाठी म्हणून काल पाण्याचा माठ घेऊन आलेय. घरी आल्यावर ३-४ वेळा माठ खंगाळून धुतल्यानंतर
पाण्याचा माठ ,
खंगाळून तीन- चारदा धुतल्यावर...
आलेला तो ओल्या मातीचा गंध….
अहाहा ! पिऊन टाकावासा वाटणारा,
त्या ओल्या माठात डोकावून,
पुन्हा तो गंध पकडण्याचा प्रयत्न.
त्या थंड, ताज्या माठात डोकावता,
पुन्हा तनामनांत शिरणारा तो,
त्या ओल्या काळोखातील ,
तो मृत्तिकेचा गंध …
अहाहा ! पिऊन टाकावासा वाटणारा,
ती थंडगार स्पर्शाची झुळूक …
काही वेडं करणारे क्षण मातीबरोबर.…
आकार दिलेल्या ओल्या मातीबरोबर…
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा