"ती".
त्या वाड्यातल्या छोट्याशा खोलीत, फरशीवर बसलेली. भिंतीला टेकून. गुडघे दुमडून, छातीशी कवटाळून. शून्य नजर समोरील भिंतीवर खिळवलेली. कुठेतरी हरवल्यासारखी. वेगळ्याच विश्वात.
ओळखूच आली नाही ती. हीच ती ? विश्वासच बसेना.
मन मागे गेलं. तिला शोधत. पाणी बरंच डोक्यावरून गेलं होतं. ६-७ पावसाळे लोटले होते तिला पाहून. तो शोधू लागला. त्या हरवलेल्या तिला..
त्याच्या वर्गात होती ती. तिला पहिल्यांदा पाहिलं ते अकरावीत असताना. कॉलेजचे सुरुवातीचे दिवस होते ते.
व्हरांड्यात उभ्या असणाऱ्या मुलींच्या घोळक्यात ती सुद्धा होती, वेगळीच. उठून दिसणारी. "ती". काळी-सावळी, जेमतेम ५ फूट उंची असलेली, बारीक अंगकाठी. चक्क परकर पोलकं घातलेली, तेल लावून केस घट्ट बांधलेली, जणू वेगळ्या जगातून आलेली. पण, त्या सगळ्या दिसण्यात नीटनेटकेपणा होता. लक्ष वेधून घेतलेली ती. तो पहातच राहिला तिला. दिसलं त्याला, तिच्या देहबोलीत, नजरेत बरंच काही! कुतूहल , उत्सुकता, प्रांजळपणा आणि शहरी मुलींच्या नजरेत न आढळणारंही अजून काहीतरी. जसजशी तिच्याशी ओळख होत गेली तसतशी ती अधिकाधिक उमगू लागली.
मराठी वाङ्मयाच्या तासाला ती असायची त्याच्या वर्गात. नेहमीप्रमाणे ती पुढल्या बाकावर आणि तो मागल्या. हरवायची जणू ती त्या तासाला स्वतःत. आणि तो हरवायचा स्वतःला, तिच्या हरवलेपणात. मराठी वाङ्मय शिकवणाऱ्या प्राध्यापिकेच्या प्रेमात होती जणू ती. भक्त त्यांची. एकदा तास संपल्यावर कानावर पडलेलं हे, ती तिच्या English Literarture घेतलेल्या मैत्रिणीला सांगत होती, " आमच्या देव मॅडम कित्ती सुंदर दिसतात. कसलं भारी बोलतात. मला तर बाई लई आवडतात." कोपऱ्यात उभं राहून तो ऐकत होता. पहात होता. ते "लई " तिच्या चेहऱ्यावरून किती ओसंडून जात होतं ते.
एकदा तिच्याकडून वही मागितली होती तिची notes घेण्यासाठी. तो त्या तासाला हजर नव्हतो तेव्हा. मोघम बोलणं झालेलं तिच्याशी. ग्रामीण भागातलं कुटुंब तिचे. शेतकरी, गवळी असलेलं. गावचे पाटील. पोटापाण्यासाठी, मुलांच्या उच्य शिक्षणासाठी शहरात आलेलं. तिची आई गावाकडेच असायची. शहरात तिचे ३ भाऊ आणि वडील राहायचे. एका भाड्याने घेतलेल्या खोलीत.
कॉलेजच्या सुरुवातीचे काही दिवस ती ‘तशीच’ दिसायची. तिच्या मैत्रिणींच्या घोळक्यात निराळी. काही महिने असेच गेले. वेळेवर येणारी, वेळेत जाणारी, पहिल्या बाकावर बसणारी ती. समूहाचा भाग होऊ पाहणारी. काहीशी गंभीर ती. एकूणच तिचं अस्तित्व कायमच तिच्याकडे खेचत राहिलं त्याला. कुतूहल निर्माण होत होतं तिच्याविषयी. पाहत होता तिला तो मैत्रीच्या नात्यातून. नंतर एकदोनदा कॅन्टीन मध्ये भेटला होता. smile देण्यापलीकडे फारसं ना ती बोलली, ना तो
अजून आठवतंय ते, जेव्हा तिला पाहिल्यावर तो जागेवरच उभा राहिला, काही क्षण. हीच ती ? सलवार -कमीज, ओढणी घातलेली, धुतलेले अर्धवट बांधलेले केस आणि नजरेत नवा आत्मविश्वास. "I am part of the group" हि भावना. तिचा शहरातलें हवामान चांगलंच मानवले होते तिला. रंगही उजळला होता थोडा. बदलत होतं जग तिचं.
तिच्या बाह्य पेहरावाबरोबर तिची भाषाही हळूहळू बदलत चालली होती. तिच्या देवाचं ती अनुकरण करत होती. सुरवंटाचं फुलपाखरू होत होतं जणू. सोनेरी स्वप्नांचा काळ तो. दोन वर्ष अशीच पाखरासारखी उडून गेली. तिला पंख देऊन. आणि एक दिवस अचानक......
"बस्स झालं तुझं कालेज-फिलेज. निघा गावाला परत." मोठा भाऊ म्हणत होता. ती सांगत होती तिची व्यथा.
कदाचित, तिचं लग्नाचं पहात असतील. कदाचित, त्या उडू पाहणाऱ्या फुलपाखराची, त्या मानसिकतेला भीती वाटत असेल ? त्याला वाटून गेल अस काहीबाही.
ती बदलत होतीच. आव्हान तिच्या नजरेत, वाणीत, देहबोलीत उतरलं होतं. स्वतःची मतं बनली होती तिची. तिला नव्हतंच जायचं परत गावाकडं !
जेव्हा ती आजूबाजूच्या मुलांच्या शिकवण्या घेऊ लागली तेव्हा मात्र ठिणगीच पडली जणू. गावाकडं जायला नाही म्हणते, शहरातल्याच मुलाशी लग्न करेन म्हणते आणि आता शिकवण्या ?
हे सगळं आपल्या हातातून निसटतंय म्हटल्यावर, ती शब्दांनी ऐकेना म्हंटल्यावर तिला मारहाण सुरु झाली. पाहता-पाहता, हे मारहाण सत्र दैनंदिन होऊ लागलं. हाती लागेल ते घेऊन ती मानसिकता तिच्यावर शारीरिक बळाचा प्रयोग करत होती.
काही काळ असं सोसून अखेर ती लग्नाच्या बंधनात बांधली गेली. नंतर परत कधी दिसायचं कारणच नव्हतं. त्यांच्या एका कॉमन मैत्रिणीकडून तिच्या बातम्या मिळायच्या. ती गावाकडं शेती करते म्हणून. तिला मुलगा झाला म्हणून.
आज समोर अशा अवस्थेत बसलेली ती. शून्य, कोरडी नजर.
मानसिक आजारावर उपाय म्हणून शहरात आणलं होतं तिला. तिच्या छोट्याला तिच्या सासरी ठेवून. काहीतरी बडबडत होती ती स्वतःशीच. बहुधा तिच्या मुलाविषयी. त्याच्यापासून तोडलं होतं त्यांनी तिला आणि दिलेलं पाठवून तिला माहेरी. ती वेडी म्हणून. 'वेड्याच्या' डॉक्टरला दाखवायला.
मी पहातच राहिलो. तिच्याकडे. भूतकाळात मागे वळून पुन्हा-पुन्हा .
वाडे पडले. इमारती झाल्या. पसरले भाडेकरू. इतरत्र. त्यात तिचं कुटुंबही.
पुढे तिचं काय झालं कुणालाच ठाऊक नाही. पण ती आठवत राहते अधून-मधून. एक पंख कापलेल्या फुलपाखरासारखी. एक अस्ताव्यस्त भिरकावलेल्या फुलासारखी.
ती !

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा