भिंती सुद्धा खूप बोलक्या असतात. मग त्या शाळेच्या असोत, सरकारी असोत, घराच्या किंवा कोणत्याही वास्तूच्या!
त्या वास्तूत वावरणाऱ्या, त्या भिंती सजवणाऱ्या व्यक्तींचं त्या प्रतिबिंब असतात. उभ्या असतात ताठ मानेनं त्यात वावरणाऱ्या व्यक्तींच्या श्रद्धा, मूल्य, विचारसरणी, प्राधान्यक्रम, प्रभाव, जीवनशैली, कलागुणांची आवड इत्यादी अंगाखांद्यावर बाळगून वर्षानुवर्षे किंवा बदलतही राहतात साजशृंगार. ते अवलंबून असतं त्यात वावरणाऱ्या व्यक्तिंवर, त्यांच्या भावविश्वावर. त्या वास्तूत येणारा तिथे किती रमतो, हे ठरवायची ताकद असते त्यांच्यात.
भिंती सुद्धा खूप बोलक्या असतात.
पाहणाऱ्याचे डॊळे आणि मनाची कवाडं उघडी असली तर ! -
तृप्ती

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा