“द बॉय ऍट द टॉप ऑफ द माउंटन” हे जॉन बॉयन या आयरिश लेखकाचं पुस्तक आत्ताच वाचून झालंय. आवडलं मला. त्याच्या आधी ” वाचलेल्या “द बॉय इन स्ट्राईप्ड पजामाज” (pajamas) पुस्तकाइतकंच.
पुस्तकाचा केंद्रबिंदू एक ७ वर्षाचा मुलगा आहे. त्याचीच गोष्ट आहे. त्याच्या भरडल्या गेलेल्या बाल्याची. सुरुवातीला त्या लहानग्याच्या वेदना, हालअपेष्ठा वाचून डोळ्यातून पाणी आलं, विशेषतः जेव्हा तो अनाथ होतो तेव्हा. वेदना वाचायला नको वाटल्या, पण मन घट्ट करून वाचलं पुढे.
पुस्तकांची ताकद असते वाचणाऱ्याला वेगळ्या विश्वात घेऊन जाण्याची. तसं हे पुस्तक घेऊन गेलं मला दुसऱ्या महायुद्धाच्या काळात फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रिया एकूण युरोपात. हिटलरच्या आजूबाजूला. संपूर्ण कथानक जगले ते वाचताना.
लेखकाची ताकद दाद आणि धन्यवाद देण्यासारखीच. ऐतिहासिक कादंबरी या सदरात मोडणारं हे पुस्तक. वाचनाची आणि त्यातही इतिहासाची आवड असणाऱ्यांनी वाचावं असं. युद्ध का नकोत या प्रश्नाचं उत्तरही ही कादंबरी देते.

मला गेले ३/४ दिवस वेगळ्या जगात जायची संधी मिळाली. चार नवीन गोष्टी कळल्या, भांडार अजून समृद्ध झालं. अजून काय पाहिजे ’ आनंदी आणि अर्थपूर्ण’ जगायला ? आणि हो, माझ्या १२ वर्षाच्या मुलाशी ‘connect’ होता आलं, कारण त्याला खूप आवडलं हे पुस्तक म्हणून त्यानं मला वाचायला suggest केलं. आम्हाला बोलायला एक नवीन विषय!
पुस्तकाचं कथानक मुद्धाम सांगत नाही. जमेल त्याने वाचावं असं आहे हे नक्की !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा