कालची,
ती.....
संध्याकाळीं, तु दिलेली फुलें
आजही...
ताजीतवानी माझ्या मनीं,
गंध त्यांचा मंद जरीही,
स्पर्श शहारे तनुभरी
सैल काही पाकळ्या जरीही,
तंगबंध मनमंदिरी
मालले दीप जरीही,
चांदण्यांचे उरीं रंग
मकरंद ओसरला जरीही,
मंजिरीच्या अंतरीं अंश
सरली ती भेट जरीही,
संग सांगती आठवणी
आजही !
कालची,
ती...
संध्याकाळीं, तु दिलेली फुलें,
आजही...
ताजीतवानी माझ्या मनीं!
- तृप्ती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा