Translate

मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१३

काटेसावर, शेवरी, शाल्मली aka silk cotton tree

चालत असताना भर गर्दीत जर एखादी आकर्षक स्त्री किंवा पुरुष दिसला तर काय होतं ? सहज मान पुन्हा मागे वळते. वळून परत  एकदा पाहावंसं वाटतं. तसचं होतंय माझं सध्या !

सकाळी फिरायला जाता-येता  अस सारखं वळून-वळून मागे बघतेय वेड्यासारखं.  

त्या काटेसावरीच्या बहरलेल्या झाडाकडे !  एखाद्या नवतरुणी सारखी वाटतेय  मला ती. ओढ लावणारी. कोणत्याही बाह्य आभूषणाशिवाय अंगच्या सौदर्याने मन खेचणारी. वेडं करणारी.   

अंगातील शुल्लक गोष्टींचा आळस, चालायला जाताना कोणी कॅमेरा घेऊन जातं का असल्या नसत्या शंका ,भीड सोडून आज सकाळी कॅमेरा घेऊन बाहेर पडले.  तसा निश्चय कालच रात्री करून टाकला होता. ते सौदर्य, ती माया, सगळं जतन करण्यासाठी, शिकण्यासाठी, share करण्यासाठी. आज सकाळी तिला भेटायचं या विचाराने पहाटे चारलाच जागी झाले, उठून बसले. अक्षरश वेड लागल्यासारखं. 

बहुधा, मग तिनेपण माझ्यावर खूष  होऊन त्या सौदर्याने, मायेने, विविधतेने माझ्यावर वर्षावच केला.  जणू , "बस अब तुम देखती रहो " असं म्हणत ! गेले होते काटेसावरीला भेटायला. तर तिने अजून तिच्या गोतावळ्यची ओळख करून दिली. तिच्या आजूबाजूच्या मित्र-मैत्रिणीची आणि तिच्या अंगाखांद्यावर, आजूबाजूला   खेळणाऱ्या पक्षांची. नीट बघून घे असं म्हणत अगदी मोकळी झाली माझ्याशी.  

ज्यांची अजून पक्की ओळख नाही त्यांचे फोटो, माहिती नंतर खात्रीशीर ओळख झाल्यावर.  तिच्या त्या अवतीभवतीच्या जगाची जेवढी ओळख मला पटली त्याचे हे काही टिपलेले फोटो. 


( गुलाबी रंगातील ही काटेसावर म्हणा किंवा शाल्मली. शाल्मली जरा जास्त बर वाटतंय गुलाबी रंगामुळे असावं :-) )

( शाल्मलीचा हा close-up घेण्याचा प्रयत्न )


(ही काटेसावर  उर्फ शेवरी उर्फ शाल्मली भगव्या रंगातली )


 (हा close-up घेण्याचा प्रयत्न, डावीकडे कोपऱ्यात बुलबुल बसल्येय )


   (हे  फुल जमिनीवर विसावलेलं )


                 ( किचनच्या खिडकीतून  दूरवर दिसणारं  तरुण काटेसावरीचं झाड AKA Red silk cotton  tree )



(  पिवळ्या रंगाचं हे वैभव. उसासे सोडायला लावणारं, पक्षांना आमंत्रण देणारं : इथून खालील काही फोटोत  )










(हे पोपट भाऊ, अगदी सर्रास दिसतात. कोवळं उन खात बसलेत. म्हटलं त्यानाही टिपूयात कॅमेरात )




(बहुधा, हि हरियाल उर्फ green pigeon ची जोडी. हे हरियाल सुद्धा बऱ्याचदा दिसतात. निष्पर्ण झाडांच्या शेंड्यावर समूहात )


आजतर  मी भरून पावले. हे असं काय-काय गवसलं आणि आळसावर, भीडेवर मात करू शकले म्हणून.

२ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

Hey first of all beautiful clicks.. te jaminivar visavalele flower baghun mala aathavale ke tyachya pakaly kadhun takalya ki aatun tyache bond ekdum malamali asate.. correct me if I am wrong..

Trupti म्हणाले...

thanks dear Prachiti, for the compliment . Next time, when I will see the flower will check it n let u know. Now season is almost over so may be next year for that research. :-)