Translate

रविवार, ३ मार्च, २०१३

अजुन काही नव्या ओळखी-पाळखी, आश्वस्थ करणारे सखे, दिलासे !



अजुन  काही नव्या ओळखी-पाळखी,
आश्वस्थ करणारे सखे,
दिलासे !



मराठीत  पांगारा, संस्कृत मध्ये मन्दारः, पारिभद्रः आणि इंग्रजीमध्ये CORAL TREE नावाने ओळखले जाणारा.  हा माझा नवीन दोस्त. आमच्या CAMPUS मध्ये भेटलेला. 


अत्यंत मोहक रंग. स्पर्शाला मुलायम, तलम अशा फुलाच्या पाकळ्या ज्यावर उभ्या शिरा स्पष्ट दिसतात. हे फुल एखाद्या काटेदार  कणीसातून  आल्याप्रमाणे दिसतं.  मला सुरुवातीला ह्या पांगाऱ्या ने चांगलंच चकवलं, पलाश असल्याच भासवून.



निळ्या नभाखाली, हिरवळीवर आणि campus च्या भिंतींना लागून.  वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर, वेगळाच भासतो पांगारा .  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: