( आज जिममध्ये असताना डोक्यात सुरु झालेलं हे असचं काहीतरी ) पूर्वीच्या बायका घरातच जात्यावर धान्य, डाळी दळायच्या. दळण करताना ओव्या, गाणी म्हणायच्या. घरबसल्या व्यायाम होत होता. भेसळ नसलेलं पौष्टीक पीठही मिळत होतं. stamina, strength आणि flexibility ही फिटनेसची त्रिसूत्री पूर्ण होत होती.
आता आम्ही बाजारातून पीठ विकत आणतो. फिटनेससाठी, वाढलेलं वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जातो. " मेरे फोटो को सिने से यार, चीपकाले सैय्या फेविकॉलसे " हे अचाट गाणं जिममधील FM वरून ऐकत treadmill वर पळत राहतो.
पूर्वीच्या बायका नदीवर, ओढ्यावर जाऊन कपडे हाताने धुवायच्या. stamina, strength आणि flexibility ही फिटनेसची त्रिसूत्री पूर्ण होत होती. कपडे आपटताना छळनाऱ्या नणंदा, सासु यांच्या बद्धलचा राग कपड्यांवर निघून कपडे स्वच्छ निघत होते. बाकीच्या मैत्रिणींशी बोलून मनं मोकळी होत होती. कामाचा थकवा जाणवत नव्हता.
आम्ही रोज-रोज अगदी २-३ कपड्यांसाठी washing machine वापरतो. पाणी-विजेचा अपव्यय करतो आणि वजन कमी करण्यासाठी फसव्या जाहिरातीच्या बळी होतो. slim नट्यांचे फोटो बघून झुरतो किंवा ऐश्वर्या राय पण अजून कशी जाड आहे हे video, फोटो बघून विचित्र समाधान मिळवतो.
स्टेशन सोडून गाडी बरीच पुढ निघून आली आहे. कशासाठी, कुठे जातोय नक्की कळत नाहीए. पण सगळ्यांच्याच गाड्या निघाल्यात सुसाट वेगात. माझी गाडी मागं राहून चालेल का ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा