रोजच बघतोय
खरचं तसं काही असतंय ?
पृथ्वी फिरतेय
आपण फिरतोय
आपलाच हा भास,
उदय आणि अस्त
सगळंच सापेक्ष !
तरीही...
सूर्योदय रोज नवा-नवा
सूर्यास्तही रोज नवा-नवा
सगळंच बदलतंय, सरतंय...
वर्षे, महिने, दिवस, तास, क्षण, क्षणाक्षणाने.....
बाह्य आणि अंतरही !
रंग सगळेच बदलत राहतात,
एक रंग पक्का हवा,
रंग विश्वासाचा !
स्वतःवरील विश्वासाचा !
दररोज उदय होणाऱ्या सूर्यासारखा !!
काल सायंकाळी,
अस्त होताना पाहिला.
काळोख दाटला !
विश्रांती पश्चात,
आज पुन्हा तो आला
पुन्हा तसाच ....
तेजोमय !
नवोदय !
अगदीं तसाच...
ऊठ तु पुन्हा पुन्हा !
एक रंग पक्का हवा
रंग स्वतःवरील विश्वासाचा !
वर्ष नवे, महिना नवा, दिवस नवा, तास नवा, क्षणही नवा !
रंग तुज हवा,
नित्यनवा,
रंग, स्वतःवरील विश्वासाचा !
- trupti 🌈
- trupti 🌈
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा