आज सकाळी M-80 सारखी एक दुचाकी, two wheeler दिसली इथे सिंगापुर च्या रस्त्यावर. आश्चर्यच वाटलं, कारण इथे फारशा दुचाकी गाड्या दिसल्या नाहीत. हे श्रीमंताचं शहर. इथे four wheelers अधिक. असो!
पण त्या M-80 सारख्या गाडीच्या काही सेकंदाच्या दर्शनाने क्षणभरात मन पुण्यात पोहोचले. पुण्यात आणि पुण्याच्या two wheelers च्या इतिहासात आणि वर्तमानात सुद्धा. हो आता इतिहासच म्हणावं नाही का M-80 ला ? M-80, M-50, Kinetic Honda, Scooty, Sunny, Activa ह्या सगळ्या गाड्या क्षणात डोळ्यासमोर तरळल्या. माझ्या पुण्यातल्या सख्या असल्याप्रमाणे. मग बजाज कंपनीची कोणती, होंडा कंपनीची कोणती, कोणते मॉडेल फार चालले, कोणते नाही इत्यादी विचाराची शेपटेही.
अगदी पुणे विमानतळाहून परत घरी जाताना प्रत्येक वेळी प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे पुण्यातील two-wheelers! आणि कुठूनही पुढे सरकायला पाहणारे त्यावर स्वार आमचे पुणेकर :-) पुणं म्हटलं कि, डोळ्यासमोर सारसबाग, पर्वती बरोबरच दुचाकी आणि त्यावर स्वार महिला (अतिरेक्यांसारखा रुमाल बांधलेल्या) येतात. मला फार भारी वाटतं ते बघून, आठवून. अभिमान वाटतो त्या आत्मविश्वासाचा.
गेल्या आठवड्यात बालीला (इंडोनेशिया ) गेलो होते. तेव्हाही पुण्याची आणि two wheeler वरील महिलाची आठवण झाली. तिकडेही सर्रास महिला two wheeler चालवताना दिसल्या, अगदी आपल्यासारख्याच. फक्त स्कार्फ ऐवजी Helmet घालून, माझ्या परदेशी, आत्मनिर्भर सख्या !
मी स्वतः सुद्धा एकेकाळी भाग होते त्याचा. कॉलेज मध्ये जायला लागल्यावर घरात पडून असलेली जुनी लुना (दुरुस्त करून) दिलेली मला वडिलांनी. प्लग मध्ये कचरा येउन अधूनमधून भर रस्त्यातही बंद पडायची. मग घर जवळ असले तर तशीच हातात नेणे, घर लांब असले तर जिथे आहे तिथे जवळपास गॅरेज शोधणे, असले उद्योग करावे लागायचे. एकदोनदा तर वैतागून, बंद पडलेली लुना रस्त्याच्या कडेला पार्क करून आल्याचेही आठवतंय. मग परत आमच्या गॅरेजवाल्या पोराला बरोबर नेऊन तिकडेच दुरुस्त केलेली. अजून तिचा नंबर पुसटसा आठवतोय. M...-3009 असाच काहीतरी. लुना जुनी, आणि पुणेरी भाषेत म्हणावं तर खटारा type होती. मला मात्र पण खूप भारी वाटायचं. तो स्पीड, ते स्वावलंबन, तो आत्मविश्वास. पुण्यात two wheeler चालवायचा आत्मविश्वास दिला त्या लुनाने !
लग्नानंतर Activa वापरायला लागले. अगदी पुणे-पिंपरी, पिंपरी- पाषाण हायवे वरून दररोज. एकदा तर पुण्यात सवाई गंधर्व संपल्यावर भर मध्यरात्री एकटी पिंपरीत परत गेले होते Activa वरून. केवढं thrill वाटलं होतं परत पिंपरीत घरी पोहोचल्यावर. हे सगळं आठवायचं कारण म्हणजे आता ते सगळं miss करते. आता पुण्यात आले तरी हिम्मत होत नाही two wheeler चालवायची.
आत्ता तर अगदी क्षणात आणि सहजगत्या त्या सिंगापुरमधील M-80 वरून डायरेक्ट पुण्यातील two wheeler वर बसलेच की, virtual Journey! मन को कौन रोक सकता है ?
ता. क :- इरावती कर्वे यांच्या बद्धल काहीतरी माहिती इंटरनेट वर शोधत होते. त्या शोधात विकिपीडिया वर वाचले की, she was the first woman to ride a scooter in Pune !
ता. क :- इरावती कर्वे यांच्या बद्धल काहीतरी माहिती इंटरनेट वर शोधत होते. त्या शोधात विकिपीडिया वर वाचले की, she was the first woman to ride a scooter in Pune !
२ टिप्पण्या:
mast lihilay Trupti....me te thrill anubhavate ahe Punyat :)... Fakt khant ekach ahe ki traffic rules follow karanare botavar mojanyaevadhech ahet..Ya comment through me hech sangu icchite ki please please traffic rules follow kara Helmet ghala,two wheeler chalavatanna mobilevar bolu naka..Red signal asel tar please green honyachi vat bagha...Aplya ya chukanmule jyachi chuk nahi ashi vyakti jeev gamavu shakate...
Hey DP!! Nice to read from you. Bhannat thrill na? :-) yes.. totally agree with you about the precautions one must take. Thanks again! Stay in touch:-)
टिप्पणी पोस्ट करा