Translate

बुधवार, ११ एप्रिल, २०१८

उन्हाळा, पंखा आणि विचारचक्र


उन्हाळा सुरु झालायं.
उकाडा, उष्णता, अस्वस्थता.

उपाय?  उतारा ?
थंडावा.  भूक गार वाऱ्याची !

पंखा. सुरु असतो सतत.
सोबत त्याची गरगर, घरघर अन वारा !
अखंड आवाज आणि गारवा.

ती फिरणारी तीन पाती,
इतक्या वेगात सुरु असतात की,
ती पाती तीन आहेत,
हा भ्रमच वाटावा,
विसरचं पडावा.

सापेक्षता ?

आइन्स्टाइनबाबा पाठ सोडेना बुवा ! 😀
सापेक्षता !
मजाच वाटते या शब्दाची,
त्याच्या अर्थाची.

खरंच सापेक्ष असतं नाही सगळं ? 

मनाची सद्यावस्था + पूर्वानुभव = आपली मते, आपली नजर ?

डोक्यावरून पाणी जातंच असतं,
उन्हाळे-पावसाळे  येत-जात असतातच !
पंखे फिरतच राहतात. 

बदलत असतं सगळं.
बदलतोय का आपण?
बदलायला पाहिजे आपण !
फिरत राहण्यासाठी. प्रगतीसाठी.
पंख्यासारखे.
आजूबाजूला गारवा शिंपित ! 

त्या पंख्याच्या पात्यांसारखीच विचारचक्र सुरूच असतात.
अखंड, अनंत.
आवश्यकच ते.
 ते चक्र, ती गती, प्रगती. 

पंखा आणि विचारचक्र,
सुरूच राहोत,
गारवा पसरत राहो,
सर्वदूर.
स्वतःच्या  दिशा आणि गती यांचं भान राखून !



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: