Translate

गुरुवार, २६ डिसेंबर, २०१९

छायेंत बोधीच्या आजही

अर्धोन्मीलित नेत्रअन्
स्मितहास्य गाली
ते भाळावरी कुंतलअन्
तें कुंडल कानीं

गुंतलें त्या कुंतलातअन् 
झुलत्या त्या कर्णफुलात
वदनावरच्या त्या तेजांतअन्
साक्षी तुझ्या त्या स्पंदनातं

ते ध्यानातीलं रूप तुझेंअन्
ती स्निग्ध-शांत लोचनें
विरले राग-लोभअन् 
गळालीसर्व व्यर्थ बंधनें

उन्मिषली तव् राजीवनेत्रेंअन्
थिजून गेली मम् गात्रें
स्मितहास्यी मी द्रवलेअन्
सकल संभ्रम निमालें

विदेहत्वी तू आज परी
संदेश तव अंतरी,  
स्व-श्वासांच्या संगे बरसती
संवेदनांच्या सरीं

स्वप्न जागर्ति अजुनही
तुझीच दिव्य लोचनें
छायेंत बोधीच्या आजही
जिवंत तूअन् 
तव वचनें अन् कथनें

तृप्ती , २६/१२/१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: