Translate

गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२०

शून्यागार

शून्यागारी शीतल शांत
विरघळती साऱ्या चिंता, भ्रांत

तमात साठल्या त्या तेजाची
ओढ त्या काळ्या काळोखाची

दिवसा अनुभव रात्र काळी
विश्व निराळें, सफर निराळीं

धावे पाझर तो आतून आतून
भेदून कड्या कपाऱ्यातून

भूताच्या त्या गाठी
सुटती नयना वाटी

मंथन अन उकल
सुरात श्वास सकल

सफरी वरती या जावे
काळे-गोरे अंतर पहावें

शून्यागारीं शीतल शांत
शून्यच प्रथमा शून्यच अंत

तृप्ती
२८ जानेवारीं २०२०






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: