काल नेटफ्लिक्स वर एक मस्त हलका फुलका सिनेमा पाहिला. Monster-in-Law!
सिनेमा पाहण्यापूर्वी इंटरनेट वर त्याचं रेटिंग चेक केलं होतं. सुमारच होतं. पण केवळ comedy या सदराखाली असल्याने आणि नावाजलेल्या अभिनेत्रींमुळे पाहायचे ठरवले. सासूच्या भूमिकेत जेन फोंडा आहे तर सुनेच्या भूमिकेत जेनिफर लोपेझ.
चार्ली (जेनिफर लोपेझ ) हि एकाच वेळी व्यावसायिक, identity (?) च्या बऱ्याच टोप्या घातलेली तरुणी. ती फॅशन designer, योगा इंस्ट्रूक्टर, temporary वर्कर असे बरेच उद्योग करणारी प्रांजळ, साधी -सरळ मुलगी.
एकदा समुद्र किनारी "पेहली नजर में पहला प्यार हो गया" होतं आणि एका सर्जनच्या प्रेमात पडते. वॊ भी, यथावकाश "उसकी आखोंमें डूब जाता हैं " अस हे सगळे टीपिकल प्रास्ताविक.
मुलगा त्याच्या प्रेयसीला घेऊन आपल्या आईला भेटायला घेऊन जातो. तिथून खऱ्या अर्थी धम्माल सुरु होते. कारण त्याच्या आईला हि साधी मुलगी पसंत पडत नाही. प्रेमात पडलेला मुलगा हातातून निसटून जाणार ह्या भीतीतून मग ती 'कबाब में हड्डी ' होऊन भरपूर खोड्या काढते.
कुटुंब, नाती यापेक्षा स्वतःचे करिअर अधिक आवडणारी व्हायोला अका सासू न्यूजरिडर पदावर काम करत असते. आता तिच्या वयानुसार, एका तरुण मुलीला भरती करून, व्यायोलाची पदावरून हकालपट्टी करण्यात आलेली असते. त्यामुळे आधीच दुखावलेली, पायाखालची जमीन सरकलेल्या अवस्थेतली हि असुरक्षित सासू एका नंतर एक खोड्या काढून चार्ली ला आपल्या मुलाशी लग्न करण्यापासून परावृत्त करायचे जमतील तेवढे सगळे प्रयत्न करते. हे सगळे प्रयत्न आणि हे लक्षात आल्यानंतर तिची जिरवण्यासाठी सुनेने काढलेल्या खोडया हे सगळं मजेशीर आहे. सिनेमाच्या शेवटी ह्या मॉन्स्टर इन लॉ ला मॉन्स्टर पद सोडून मदर इन लॉ व्हावे लागतें.
२००५ मधला हा सिनेमा रोमँटिक कॉमेडी सदरापेक्षा अगदी आपल्याकडच्या सासू सुनांच्या (तू तू मैं मैं ) चीच इंग्लिश आवृत्ती वाटली.दीड तासाचा हि जुगलबंदी पाहताना मजा आली. मानवी स्वभाव, नातेसंबंध ह्याच खुसखुशीत चित्र मला तरी आवडलं. एकदा तरी नक्की बघण्यासारखा आहे हा सिनेमा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा