भिंतीवरचं घड्याळ,
मला आजोबांसारख वाटतं .......
त्याची जागा,
स्थायी.. ठरलेली...
मला आजोबांसारख वाटतं .......
त्याची जागा,
स्थायी.. ठरलेली...
आजोबांच्या सहवासासारखी
आजोबांच्या सवयीसारखी...
अखंड चालत असतं ......
निरपेक्षपणे.....
अखंड चालत असतं ......
निरपेक्षपणे.....
आजोबांच्या सोबतीसारख...
घड्याळ भिंतीवरून काढल्यानंतर ,
भिंत मोकळी दिसल्यावर,
इतकं त्याच असणं गृहीत धरलेलं !!!
आजोबांसारख.......
सोबत असताना कळलच नाही,
नसल्यावर मात्र,
फार चुकल्यासारखं वाटत राहतं...
फार चुकल्यासारखं वाटत राहतं...
आजोबांसारख.......
मोकळ्या भिंतीवर नजर गेली की जाणीव,
अरे घड्याळ कुठाय?
नाहीये भिंतीवर !!!
नाहीये भिंतीवर !!!
आजोबानंतर पण असच काहीसं वाटतं....
चुकल्यासारखं....
काहीतरी अर्धवट राहिल्यासारखं...
- तृप्ती
७ नोव्हेंबर, २०१२.- तृप्ती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा