Translate

मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२५

निर्माल्य

उदबत्तीचा गंध अनुभवताना हया काही ओळी सुचल्यात….

तव गंध मंद 

संवेदना जेरबंद 


अहाहा! काय हे जगणे

आसमंती भरून उरणे


व्हावे असे निर्माल्य,

नूरे कसलेच शल्य 


घ्यावा असा निरोप, 

जावे लावून रोप


अस्थींची रेखीव रांगोळी 

सुगंध ओसंडूनी ओंजळी 


©️तृप्ती, 

१८ फेब्रुवारी २९२५,

जिनिव्हा





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: