नर्गिस
वसंतागमन झाले सांगे, ही हळदुली जळीस्थळी
पिवळेपिवळे चषक उभे हे, सोबत षटपाकळी
संदेश घेउनी सरली थंडी, चहुदिशा आनंदी
सरले बंधन, सूर्या वंदन, नाविन्याची नांदी
दिवस उजेडी येती कानी, स्वरमैफली पशुपक्षी
वसंतराजा आला दारी, काढू रांगोळी रेखीवनक्षी
म्हणा कुणी तिज डॅफ्डल्स, म्हणा कुणी नर्गिसं
बस नामनिराळे … बस नामनिराळे !
निरोप एकचं !
निवाला हट्टी हिवाळा, आले उल्हासाचे दिसं
धाडीती निसर्ग निरोप, मन माझे मोर, मोरपीस!
तृप्ती,
जिनिवा, स्वित्झर्लंड
२० मार्च २०२५.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा