प्रतिसादाची साखळी

स्थळ:- होंग-छ्याव रोडवरील एक बस-थांबा, शांग-हाय. वेळ:- दुपारी साधारण १२.३० पात्रे:- आजी, आजोबा, २ छोटी नातवंडे आणि मी . पार्श्वभूमी:- दुपा...

Thursday, November 20, 2014

एक दिवस

(आत्ता बसले होते जरा  सगळी कामं आटपून डायरी लिहायला. हातातून एकदम हे काहीतरी उतरून आलय. ताजे ताजे ! राहवत नाही share केल्याशिवाय म्हणून इथे टाकतेय. ;-) )

एक दिवस रणरणत्या उन्हाने जीवाची उलघाल,
एक दिवस शीतल वाऱ्याच्या झुळुका,

एक दिवस वाऱ्यापावसाने माझी नौका हेलकावते, भरकटते,
एक दिवस काय सुंदर लयीत माझी नौका प्रवास करते,

एक दिवस लेखणी, रंग, ब्रश खट्टूच होतात माझ्यावर,
एक दिवस वेळकाळाच भानच हरपून बसते त्यांच्या संगतीत,

एक दिवस ठरवलेल्या गोष्टी, कामं करून घेणारा,
एक दिवस भलतच काहीतरी उपटून काम वाढवणारा,

हिशोब एक-एक दिवसाचा.

आता हे समजायलाच हवं.

काळ्यानंतर पांढर, पांढऱ्यानंतर काळे,
रात्रीनंतर प्रकाश, प्रकाशानंतर रात्र,

हे चालणारच !

मलाही चालत राहायला हवं,
सगळे दिवस,
समान चालीने,

No comments: