काल रात्री पडल्यापडल्या दुर्गा भागवतांचं "दुपानी" वाचत होते.
ह्या पुस्तकाच स्वरूप एखाद्या blog सारखच आहे.
यात दुर्गा बाईनी "अचानकातला लाभ " यात मानिनी सिनेमातील अरे संसार संसार या गाण्यातील दृश्यांबद्धल लिहिलंय. मुख्यत्वे, रत्नमाला या अभिनेत्री चुलीजवळ बसून भाकरी करते आहे याबद्धल खूपच छान लिहिलंय. विचार करायला लावणार आहे. कुतूहल म्हणून ते गाणे you tube वर शोधले. ते सापडले. त्यातील "अरे संसार संसार दोन जीवांचा विचार " या ओळी विशेष भावल्या :-))
गाण्याची लिंक ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा