काही “आत” भिडलं की,
‘काहीसं’,
“अस्वस्थ” व्हायला होतं.
ते “अस्वस्थ“,
कधी “स्वस्थ” करणारं,
तर कधी “अस्वस्थ“ करणारं!
उतरावावसं वाटतं कागदावर.
वाटावंसं वाटतं म्हणून.
शब्द येतात सोबतीला,
मग खेळते त्यांच्या संगे.
वाटलेल्याला ’वाट’ द्यायचा प्रयत्न करते,
वाटून मोकळी होईपर्यंत ?
- तृप्ती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा