Sunday, March 24, 2013

तबियत खूश हो गयी ...

अर्हनला म्हटलं, " चल ".  तर, " मी नाही येत " म्हणाला. त्याला तसच घरात एकट सोडून,  घरातला पसारा सुद्धा तसाच टाकून आज सकाळी खाली उतरले . दररोज खुणावणाऱ्या, साद घालणाऱ्या या राजाने आज ओढून, खेचून नेलं .

 ही मंडळी आमच्या शेजारील कॅम्पसमध्ये राहतात. सकाळच्या वेळी बेडरूमच्या खिडकीतून त्याचं सहजपणे दर्शन होतं. त्यांची केका कानी पडते. 

या माझ्या अशा जाण्यावर, ओढीवर, या झपाटलेपणावर माझाच विश्वास बसत नाहीये . वेड,  ओढ, आस की अजून काय म्हणू याला ? आपल्याच अंतरंगात कसलेकसले साठे, ओढी दडल्या आहेत त्याची प्रचीती अशा वेळी येते म्हणावं, का बाह्य वातावरण आपल्या शोधाला कारणीभूत ठरतं म्हणावं ? की अजून काय ? 

असो तूर्तास हे प्रश्न भिजत घालते. पिंजत बसेन निवांत क्षणी.   

तर, त्या काटेसावरीने जसं नवीन नातं जोडलं. तसंच हा राजा मला त्याच्या विश्वात घेऊन गेला. त्याच्या सौंदर्याने, अदांनी पुरतं घायाळ केलं. सगळं डोळ्यात, हृदयात साठवून घेतलंय. भरभरून. कॅमेरातही बंदिस्त केलंय दृश्य स्मृती म्हणून.  त्यापैकी ही काही चित्र . 


ही एक लांडोर. तीला जमिनीवरून या दिव्याच्या खांबावर उडत जाताना पाहिली. 
ह्या सख्या नजरेने संवाद साधताना.    उसासे सोडायला लावणारे सौंदर्य, जादू, माया ?

 हे महाराज पंख पसरण्याच्या  तयारीत ?

 लांडोरच्या पाठीमागे अजून एका मोराचा पिसारा दिसतोय.   
मयुर विहार क्लिपमध्ये टिपण्याचा एक प्रयत्न

http://www.youtube.com/watch?v=KIjaojaSLJA&feature=youtu.be


निर्विवाद सौंदर्याची खाण 
  इतका राजबिंडा, देखणा नर असल्यावर आजूबाजूला माद्या का नाही घुटमळणार ?
कधी कधी स्वतःचाच स्वतःला हेवा वाटतो. तसं आज झालयं. मयुरांच्या संगतीत तबियत खूश हो गयी ... .


No comments:

Winter special Bajra Ladoos

Ingredients:- 3 cups bajra flour, 1.5 cup grated jaggery, approx. 1 cup ghee, 1 tbsp cardamon powder, 2 tbsp dry ginger (soonth...